लोहारा/प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका व मिलाप मित्र मंडळ लोहारा यांच्यावतीने सामाजिक विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक भावना जपत शहरातील गरीब, गरजु, कुटुंबाना अन्न, धान्य व किराणा साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, मिलाप मित्र मंडळाचे अध्यक्ष दादाभाई मुल्ला, जब्बार मुल्ला, पं.स.सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा जिल्हा सचिव बालाजी चव्हाण, बाळु माशाळकर, जयेश सुर्यवंशी, बसवलज कोडे, अमर कांबळे, गणेश सोमवंशी, शशीकांत गायकवाड, आदम मुल्ला, खाशिम मुल्ला, जलाल मुल्ला, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.