लोहारा/प्रतिनिधी
युग प्रवर्तक, बहुजन प्रतिपालक, भारत भुषण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे युवा नेते समरजितसिंह भैय्या ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, ता. उपाध्यक्ष रमेश पवार, किसान मोर्चा ता.अध्यक्ष कांतीलाल पाटील, निशिकांत क्षिरसागर, ब्रम्हदेव उपासे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.