पत्रकार यांच्यावर किशोर कदम यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा, पत्रकारांचे निवेदन

0

उस्मानाबाद - तालुक्यातील कसबे तडवळा येथील पत्रकार किशोर कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालय कसबे तडवळे यांचा माहिती अधिकारात 2015 चे 2021 या कालावधीतील घरकुल घोटाळा उघड केलेला आहे व इतर घोटाळे ही माहिती अधिकारा च्या माध्यमातून बाहेर काढत आहेत.याचा राग मनात धरून सरपंच किरण उर्फ मनमत आवटे यांच्या गाव गुंडांनी पत्रकार किशोर कदम वडील दिगंबर कदम यांच्या घरी जाऊन घराबाहेर  बोलावून घेऊन   रुमाला मध्ये दगड बांधून सळई व चैन आणि मारहाण करून जखमी केले आहे. तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी व किशोर कदम यांना संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी पत्रकारांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सुधीर पवार, अनंत साखरे, काकासाहेब कांबळे, रहीम शेख, अजित माळी, बिभीषण लोकरे, कैलास चौधरी, आकाश नरोटे, कुंदन शिंदे यांच्यासह इतर पत्रकार  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top