Osmanabad news :-
उस्मानाबाद (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्शगाव पाटोदा येथील परिवर्तन वादी विचाराचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे आज शिंगोली (ता.जि. उस्मानाबाद) येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भास्करराव पेरे पाटील यांनी गाव कारभारी कसा असावा! गाव करील ते राव काय करील यासारख्या म्हणी प्रत्यक्षात अमलात आणल्या आहेत. गावाचा कायापालट आणि परिवर्तन करून भास्करराव पेरे पाटलांनी जगभरात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.
त्यांनी आपल्या पाटोदा गावचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ( दिनांक २ मार्च) शिंगोली येथे भास्करराव पेरे पाटील यांचे सायंकाळी ७ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे या व्याख्यानाला गाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राहुल शिंदे मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.