उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात ,जागतिक कर्णबधिरता दिन साजरा

0

Osmanabad news :- 

Osmanabad :- आज जिल्हा रुग्णालय उस्मामबाद ,येथे जागतिक कर्णबधिरता दिन साजरा करणयात आला ,तसेच दिनांक 3.3.2022 ते 10.3.2022 पर्यंत कर्णबधिर सप्ताह पण साजरा होणार आहे ..


   त्या अनुषंगाने आज दिनांक 4.3.2022रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे उपस्थित सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना कानाची काळजी आणि निगा कशी राखावी तसेच कोणी लहान बाळ कर्णबधिर असेल तर त्यांनी वेळीच त्या बाबत उपचार घेण्याबाबत डॉ सचिन देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले ,तसेच कानाच्या बाबतीत कोणाला काही तक्रारी आढळून आल्यास वेळेत उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ डी के पाटील सर यांना केले .


   सदरील कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ डी के पाटील ,अति जि .श. चि .डॉ सचिन देशमुख सर ,अति .जि. श. चि .डॉ गोसावी सर ,कान, नाक घसा तद्द .डॉ रवींद्र पापडे सर ,मेट्रेन श्रीमती गोरे मॅडम ,डी.इ. आय.सि. मॅनेजर डॉ शिनगारे सर ,ऑडिओलॉजिस्ट गणेश चव्हाण ,स्पीच थेरपिस्ट पांडुरंग कोळेकर ,जोतिराम ओव्हाळ ,शहाजी कदम ,ऑडिओलॉजिस्ट लता पवार हे उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष पोतदार यांनि केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top