बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न

0



Osmanabad news :- 

बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न

रुग्णसेवा करणाऱ्या महिलांचा केला सन्मान*

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून गरजूंना अन्नदान, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यासह परिसरातील महिलांची सेवा केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त रुग्णसंख्या असतानाही अपुऱ्या साधनसामग्रीत येथील डॉक्टर्स, परिचारिका व सेविका रुग्णसेवेचे काम करीत आहेत. आज बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्री रुग्णालय परिसरात "कृतज्ञता सोहळा" आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी, डॉ.अश्विनी बलवंडे, अधिपरिचारिका कल्पना भाटे यांच्यासह 55 महिला डॉक्टर्स, परिचारिका व सेविकांचा उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रमाणपत्र, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक सय्यद खलील सर, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, सुरेंद्र पाटील, प्रदीप घुटे,  मानवाधिकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, अलीम शेख, सांस्कृतिक विभागाचे प्रेम सपकाळ, रणधीर घुटे पाटील, अतिफ काझी, अतुल चव्हाण, इरफान कुरेशी, अशोक बनसोडे, आरेफ मुलानी, जमील सय्यद, महादेव पेठे, हबीब खान, संतोष पेठे, तश्कील सय्यद, नियामत मोमीन, शंकर पेठे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत पाटील यांनी केले तर आभार प्रभाकर लोंढे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top