google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 रांजणी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण भूमिपूजन

रांजणी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण भूमिपूजन

0


Osmanabad news :- 


रांजणी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण भूमिपूजन

 

उस्मानाबाद :- खरीप २०२० मध्ये विमा कंपनीला रुपये ५५० कोटीचा नफा होऊन देखील शेतकऱ्यांना हक्काचा विमा दिला जात नाहीसातत्याने पाठपुरावा करून देखील राज्य सरकार याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीअसे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी रांजणी ता. कळंब येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

 

रांजणी येथील गरज लक्षात घेऊन २०१९ मध्ये येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी निधी दिला होता. या इमारतीचे लोकार्पणउपकेंद्राच्या संरक्षक भिंत व अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजनहजरत ख्वाजा बद्रोद्दीन दर्गा येथे सभामंडप भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत १०० लाभार्थ्यांना घरकुलाचे हस्तांतरण व जनसुविधादलित वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब म्हणाले किसध्या ऊसाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून रांजणी मध्ये आणखीन जवळपास ४५० एकर ऊस शिल्लक आहे.  संपूर्ण जिल्ह्यात साधारण २६ हजार एकर ऊस शिल्लक आहे. या विषयाच्या अनुषंगाने साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांच्याशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून इतर जिल्ह्यातील कारखान्यांची मदत घेणे सुरू आहे.

खरीप २०२० पिक विम्या बाबतची राज्य सरकारची  अनास्था दुर्दैवी आहे. विमा कंपनीला सुमारे ५५० कोटींचा नफा होऊन देखील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. परंतु हा प्रश्न मार्गी लावल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. कौडगाव एमआयडीसी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहोत मात्र उद्योग मंत्री अजूनही बैठक लावत नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नाही. परंतु हा प्रश्न मार्गी लागल्यास किमान १०,००० युवक युवतींना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल. मराठाओबीसी आरक्षणाबाबतही राज्य सरकार आणि सत्ताधारी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचे ते म्हणाले. रांजणीकळंब येथील नागरिकांनी जे प्रेम दिले आहे. त्याची मला सदैव जाणीव  आहेकोणत्याही नागरिकांनी अडचण असल्यास निःसंकोचपणे मला संगयाव्यातत्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

यावेळी जि. प.अध्यक्षा सौ. अस्मिताताई कांबळेमहिला व बालकल्याण सभापती सौ. रत्नमाला टेकाळेपंडितराव टेकाळेरामहरी शिंदेदत्तात्रय साळुंकेलक्ष्मण देशमुखकिरण पाटीलफेरोजखान पठाणअलीम शेखमतीन पाटीलसरपंच राजाभाऊ आगरकरउपसरपंच अन्सार भाई शेखमुजमील सय्यद ग्रा. प.सदस्य ताहेर पटेलव्हाईस चेअरमन वाहेद शेखरांजणी अमोल सरवदेराजाभाऊ पाटीलउस्मानपाशा शेखबद्रीनारायण धुप्पाधूळेइसाक पठाणराजू पटेलअलीबाबा पटेलमेहबूब शेखमिया भाई शेखबशूमिया शेख,  श्रावण सोनपारखेरामा सोनपारखेसलीम बागवान आदी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top