Osmanabad news :-
मराठवाड्यात प्रथमच तुळजापूर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन
osmanabad :- मराठवाड्यात प्रथमच आई तुळजाभवानी ची पावन भूमी असलेल्या तुळजापूर मध्ये शिवबाराजे प्रतिष्ठान तर्फे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.
या शर्यतीचा उद्घाटन समारंभ खासदार ओमराजे निंबाळकर , जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा घाडगे-पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजेच बैलगाडा शर्यत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठवाड्यात प्रथमच तुळजापूर येथे शिवबाराजे प्रतिष्ठान यांच्याकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसेंदिवस शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला असला तरी स्वत:च्या मुलांप्रमाणे बैलांचा संगोपण करुन शेतकरी बैलगाडा शर्यतीमध्ये हिरीरीने भाग घेत असतात. याचाच एक भाग म्हणुन तुळजापूर येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये पंचक्रोशितील शेतकऱ्यांसह शेजारच्या काही जिल्ह्यातील शेतकरी आपल्या बैलजोडीसह सहभागी होण्यासाठी आले होते. आयोजकातर्फे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.
यावेळी महंत महंत माऊजी नाथ महाराज, महंत आरण्यनाथ महाराज, आयोजक अर्जून आप्पा साळुंके, आतिश भैय्या घाडगे-पाटील, नरेश अमृतराव, रणजित इंगळे, चिन्मय मगर, चव्हाण, सिद्राम कारभारी, बालाजी पांचाळ यांच्यासह शिवबाराजे प्रतिष्ठान चे सर्व आयोजक - संयोजक, बैलगाडा शर्यत प्रेमी, शेतकरी, युवक मित्र, पत्रकार बांधव आणि हजारो नागरिक उपस्थित होते.