Osmanabad news :-
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार
उस्मानाबाद :- उस्मानाबाद येथे सह्याद्री अभ्यासिका मध्ये आयोजित नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभास खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास घाडगे - पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू राजेनिंबाळकर यांच्यासह उपस्थितीत झाला
याप्रसंगी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले आपल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार पारदर्शक नोकर भरती करण्याबाबत सातत्याने प्रयत्नशील आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनावर कोणताही ताण - तणाव न घेता संयम आणि सातत्य या तत्त्वांचा अवलंब करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. अधिकाऱ्यांनी काम करताना आपल्या भूतकालीन परिस्थितीची जाणीव ठेऊन जन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करून काम करावे अशी प्रांजळ भावना खासदार यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांच्यासह, पालक, विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते