तुळजापूर :- (प्रकाश साखरे )
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे भजन गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे सामुदायिक पूजन करण्यात आले यावेळी ह. ब. प. विकास पाटील महाराज, पकवाज वादक काशिनाथ उंबरे, ज्ञानेश्वर शिंदे, विष्णु भालेराव, पंपू मुळे, चोपदार धनाजी मुळे, राजू जाधव, ज्ञानदेव (भाऊ) उंबरे, सुधाकर पाटील, काशिनाथ मुळे, सुरेश उंबरे, खंडू जाधव सावकार, लहान थोर मंडळी, महिला मंडळ व काळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. १० वाजता प्रतिमेच्या पुजना नंतर १२ वाजता गुलाल उधळण्याचा कार्यक्रम पार पडला व सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तुकाराम महाराज बीज या कार्यक्रमात महाप्रसाद खंडू जाधव सावकार यांनी दिला आहे