उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी व तामलवाडीत चोरी गुन्हे दाखल
वाशी पोलीस ठाणे : दिनांक 18 मार्च रोजी 19.30 वा वर्षा विशाल बडे व त्यांचे पती असे वाशी फाटा राष्ट्रीयमहामार्गावरुन जात असतांना यातील आरोपी लहु काळे, किरण पवार, राहुल पवार, अनिल शिंदे , अशोक शिंदे, नवनाथ पवार, कविता शिंदे, सोनारबाई काळे, आशाबाई काळे, उषा काळे, छाया शिंदे , दुर्गा पवार, चतुराबाई पवार, आशाबाई काळे सर्व रा. बारलोणी पारधी पिढी वाशी व इतर यांनी वर्षा बडे यांचे जवळील रोख रु 6000/- रुपये व तीन तोळयाचे सोन्याचे गंणठण हे बळजबरीने काढुन घेतले. शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वर्षा बडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 395, 427, 324, 323, 504, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे : दिनांक 18 मार्च रोजी 10.00 ते 19.00 वा चे दरम्यान काटी येथील रहिवाशी रघुनाथ आगलावे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश स्टीलच्या टाकीत दाळीमध्ये ठेवलेले 82 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले.अशा मजकुराच्या रघुनाथ आगलावे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : लाखनगाव येथील सतिष सुभाष मोरे यांची दिनांक 15 मार्च रोजी 06.00 चे पुर्वी कोणीतरी अज्ञात चोरटयाने एक काळया रंगाची जर्सी गाय ही चोरुन नेली अशा मजकुराच्या सतिष सुभाष मोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.