उस्मानाबाद शहरात दोन ठिकाणी व नळदुर्ग येथे चोरी गुन्हे दाखल
नळदुर्ग पोलीस ठाणे : होर्टी येथील राहणारे वैजीनाथ नामदेव सगर हे दिनांक 01 मार्च रोजी 05.30 ते 07.30 वा चे दरम्यान होर्टी तलावाच्या बाजुस आपली मोटार सायकल क्र. एम.एच. 13 डी के 2306 ही लावुन मासेमारी करीत होते. दरम्यानच्या वेळेत ती मोटार सायकल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या वैजीनाथ नामदेव सगर यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : नेहरु चौक उस्मानाबाद येथील एका किराणा दुकाना समोरील सु.190 कि.ग्रॅम खाद्य तेल असलेले पिंप दिनांक 16-17 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवाजी घोडके यांच्या दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : समता वसाहत येथील शिवशाही रसवंती ग्रहाच्या शटर दिनांक 23-24 मार्च दरम्यान अज्ञात व्यक्तीने उचकटुन आतील 9500 रुपये रोख रक्कम तसेच आईसक्रिम व बिस्कीटाची प्रत्येकी दोन खोकी असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दयासागर वैरागी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.