Osmanabad :-
जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या वतीने उमेद अभियानांतर्गत राजमाता जिजाऊ स्वावलंबन योजने अंतर्गत महिला बचत गटांच्या यशोगाथा मधून महिला बचत गटांच्या कामाची तसेच यशस्वी महिलांची माहिती दूरदर्शन आणि आकाशवाणी च्या माध्यमातून जनते पर्यंत पोहोचवल्यामुळे उस्मानाबाद जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल दूरदर्शन आकाशवाणी दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधीश्री देविदास पाठक यांचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाअस्मिता ताई कांबळे उस्मानाबाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल गुप्ता यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा महिला बालकल्याण सभापती सौ.शोभा टेकाळे, केंद्र सरकारच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. अंकुश चव्हाण, उमेद चे प्रकल्प सल्लागार श्री.बलबीर मुंडे उपस्थित होते.