शासनाच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी कलापथकांच्या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हयात सुरूवात

0


 

Osmanabad news : 

उस्मानाबाद,दि.09 ):-राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाने दोन वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी तीन कलापथकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही कलापथकांनी आज जिल्हयातील सहा गावांमध्ये कार्यक्रम केले.त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

जिल्हयात आज पासून 17 मार्च 2022 पर्यंत विकास कामांची माहिती देण्यासाठी लोककला पथकाच्या कार्यक्रमांचे नियोजन येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.यासाठी शासनाच्या 16ऑक्टोंबर 2021 च्या शासन निर्णयातील यादीत समाविष्ठ असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील गोरे वाडी आदर्श लोकजागृती कलामंडळाचा यात समावेश आहे.या कलापथकांने आज उस्मानाबाद तालुक्यातील बाजाराची गावे असलेल्या समुद्रवाणी आणि कोंड येथे कार्यक्रम केले तर तुळजापून येथील महिषासूर मर्दिनी सास्कृतिक लोक कलामंचाने कळंब तालुक्यातील मांडवा आणि येरमाळा येथे कार्यक्रम केले.उस्मानाबाद शहरातील ईश्वर प्रभु कला मंचाने आज कळंब तालुक्यातीलच शिराढोण आणि मगरूळ येथे कार्यक्रम केले.या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी या कला पथकांच्या कार्यक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

लोककलाच्या माध्यामातून मनोरंजनातून लोक प्रबोधन आणि जनजागृती करत शासनाच्या विकास योजना,उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे.राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती या व्दारे नागरिकांना कळणार आहे. त्यामुळे या नागरिकांना योजनांचा लाभही घेता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top