Osmanabad news :
उस्मानाबाद,दि.09 ):- उस्मानाबाद जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 40 बालविवाहांना रोखण्यात आले आहेत.अनेक ठिकाणी सूचना मिळाल्यावर वेळीच पोहोचून पाल्यांची समजूत काढून मुलींचे विवाह थांबविण्यात आले आहेत.मुलींचे बालवयात विवाह थांबवून मुलींना शिक्षण आणि करिअर घडविण्याची संधी देऊन योग्यवेळी विवाह करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येथे केले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डी.पी.डी.सी हॉल येथे जिल्हा बालविवाह निर्मुलन प्रकल्पांतर्गत जिल्हा कृती दलाच्या बैठक घेण्यात आली, तेंव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा कार्यक्रम अधिकारी(बालविकास) बि.एस निपाणीकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही अंकुश,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, पोलीस उपाधिक्षक श्रीमती शेख, सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियरचेंज कम्युनिकेशन निशित कुमार, हॅलो फाऊडेशन (SBC3) संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अहंकारी,टाटा इन्सटिट्यूटचे प्राचार्या चादरे एसबीसी3च्या प्रकल्पप्रमुख सीमा कोनाले, प्रकल्प समन्वयक सोनिया विक्रम हंगे आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे बंद पडलेल्या उपक्रमांना पुन्हा सुरुवात करण्यात यावी.सखी मंचाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींमध्ये प्रबोधन करून त्यांना उच्च शिक्षण आणि आरोग्याबाबत जागरुक करावे. 15ते 19 वयोगटातील मुली रक्ताषयाने अशक्त आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रांतील महिला कर्मचारी,आशा वर्कर्स आणि आरोग्य संस्थांनी सर्वेक्षण करुन शहरी आणि ग्रामीन क्षेत्रातील मुलींना आरोग्य शिक्षण आणि आहाराबाबत मार्गदर्शन करावे.असेही श्री .दिवेगावकर यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींचे विवाह केले जातात,त्याची पूर्वसूचना मिळाल्यावर त्या मुलीच्या पाल्यांना भेटून त्यांना कायाद्यातील शिक्षा आणि कर्यवाही बाबत कल्पना द्यावी. कोरोनामुळे अनेक उपक्रम राबविण्यात अडचणे निर्माण झल्या होत्या .सर्व शासकीय आणि प्रशासकीय उपक्रम पुन्हा सुरु करून जिल्ह्याला प्रगतीच्या रुळावर पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असेही श्री.दिवेगावकर यावेळी म्हणाले.
बाल वयात मुलींचे विवाह करण्याची प्रथा थांबवण्यासाठी त्या समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.समाजातील विविध घटकातील पालक आपल्या मुलींचे बालवयातच विवाह करण्यासाठी का तयार होतात त्याचा शोध घेण्याची गरज आहे.त्यामुळे यासाठी जिल्ह्यात विशेष गटाची स्थापना करून मार्च अखेर पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावे.याबाबत महिला व बालविकास अधिकारी यांनी समन्वयकाचे काम करावे.या सर्वेक्षणाच्या आधारावर बालविवाह करू पाहणा-या पालकांचे समुपदेशन करणे शक्य होईल.एवढेच नव्हे तर बाल विवाह थांबवण्यासाठी एक कृती आराखडा शासनास सादर करता येईल. असेही श्री.दिवेगावकर यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी युनिसेफ (UNICEF) चे प्रतिनिधी निशित कुमार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात वयाच्या 18 वर्षापूर्वी लग्न झालेल्या महिला 36 टक्के असल्याचे सांगितले.उंची , वजन, वय आणि शिक्षणाची पर्वा न करता बालविवाह करणे म्हणजे आपल्या मुलींना नर्कात टाकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभाग,शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,पंचायत विभाग आणि एकात्मिक बाल विकास या खात्यांना अधिक तत्परतेने काम करण्याची आवश्यकता आहे.या विभागांनी प्रतिबंधात्मक आणि हस्तक्षेपाची भूमिका बजावणे अत्यंत महत्वाचे आहे.असेही श्री.कुमार यावेळी म्हणाले.