येरमाळा येथे ९७ हजार रुपयाचे सामान चोरी , तुळजापूर येथे ४४ ग्रॅम सुवर्ण दागिने, ८० हजार रुपये रक्कम चोरी गुन्हे दाखल

0


Osmanabad news :- 

येरमाळा येथे ९७ हजार रुपयाचे सामान चोरी , तुळजापूर येथे ४४ ग्रॅम सुवर्ण दागिने, ८० हजार रुपये रक्कम चोरी गुन्हे दाखल 


येरमाळा पोलीस ठाणे : पुण्याहुन उस्मानाबाद कडे येणा-या एका खाजगी प्रवासी बसची डिकी दिनांक 07-8 मार्च दरम्यानच्या रात्री गौर शिवारात अज्ञात व्यक्तीने फोडुन उघडुन आतील पोते, बॅग असे 97,000 रुपये किमतीचे सामान चोरुन नेले.अशा मजकुराच्या सोनाबाई शिंदे रा.गौर यांनी दि. 08.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



तुळजापूर पोलीस ठाणे : काक्रंबा येथील संभाजी साबळे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा दिनांक 07-8 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने वाकवुन घरातील लोखंडी पेटी उचकटुन आतील 44 ग्रॅम सुवर्ण दागिने, 80,000 रुपये रक्कम व 5 नवीन साड्या चोरुन नेल्या.अशा मजकुराच्या संभाजी साबळे यांनी  दि. 08.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती आज 9 मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हा पोलीस माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top