परंडा पोलीस ठाणे : परंडा पोलीस ठाण्याचे पथक दिनांक 08 मार्च रोजी गावातील वारदवाडी चौकात सकाळी 06.00 वा कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी पिकअप वाहन क्रमांक एम एच 25 ए जे 2112 व एम एच 45 एच एफ 1655 ला अडवुन तपासणी केली असता त्या दोन्ही वाहनांतुन माढा-सोलापुर येथील चालक शहनवाज कुरेशी व अकीब काझी हे दोघे 11 जरशी गाईंसह एका बैलाची दाटीवाटीने अवैध वाहतुक करत असल्याचे आढळले. यावरुन सहा.पोलीस फौजदार भाउसाहेब जगताप यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन पशु क्रुरता अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल
मार्च ०९, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा