स्त्री रुग्णालय उस्मानाबाद मध्ये जागतिक महिला दिन सप्ताहा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला

0





Osmanabad news : 

उस्मानाबाद :- 
जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री रुग्णालय उस्मानाबाद रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ .स्मिता सरोदे गवळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली  सप्तहा साजरा करण्यात आला. दिनांक २ मार्च २०२२ ते ०८ मार्च २०२२ या दरम्यान रुग्णालयात महिलांचे स्तनाचे कर्करोग व गर्भाश्याचे कर्करोग याची मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिराचा लाभ महिलांनी घेतला.

 तसेच  महिला रुग्ण व रुग्णांच्या महिला नातेवाईकांची ब्लड प्रेशर,शुगर,व हिमोग्लोबिन ची मोफत तपासणी करण्यात आली . या सप्तहात  रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना गरोदर मातेची काळजी व त्यांचा आहार ,बाल संगोपन,बाळाचे लसीकरण,गरोदर मातेचे लसीकरण व घ्यावयाची काळजी या विषयावर सर्व वार्डात व क्लिनिक मध्ये माहिती दिली. 


या सप्तहा मध्ये रुग्णालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचार्यांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, उखाणे, काव्य वाचन, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. 


 जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री रुग्णालय मध्ये अधिकारी व कर्मचारी हे  स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक ०८/०३/२०२२ रोजी बक्षीस वितरण समारंभ व स्त्री जन्माचे स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


 या कार्यक्रमासाठी मा.रूपाली आवळे मॅडम (निवासी उपजिल्हाधिकारी), मा.डॉ. धनंजय पाटील (जिल्हा शल्यचिकित्सक) मा. डॉ. अनुराधा गरड मॅडम (अद्यक्ष फॉक्सी) , मा. डॉ. स्मिता घोगरे मॅडम,मा. डॉ. स्मिता सरोदे गवळी मॅडम (वैद्यकीय अधीक्षक) मा. डॉ. सूर्यवंशी सर ( वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ ), मा. डॉ. साबळे सर, मा. डॉ. शैलजा मिटकरी मॅडम, मा. डॉ. सोनाली पाटील मॅडम, मा. डॉ. सोनटक्के सर यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी या सप्तहात स्त्री रुग्णालय मध्ये जन्मलेल्या मुलींचे व मातेचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी मेट्रन कल्पना भाटे मॅडम, मेट्रन गोरे मॅडम, काझी मामा, संजय मुंडे व सर्व विभागाचे इनचार्ज सिस्टर, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पोतदार यांनी केले व आभार प्रदर्शन कल्पना भाटे मॅडम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top