google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी रस्ता अपघात , २ ठिकाणी मारहाण

उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी रस्ता अपघात , २ ठिकाणी मारहाण

0



Osmanabad news :- 

उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी रस्ता अपघात , २ ठिकाणी मारहाण 

कळंब पोलीस ठाणे : पिंपळगाव (को.), ता. वाशी येथील अनंत महादेव लाड, वय 35 वर्षे हे दि. 26.02.2022 रोजी 11.00 वा. सु. खोंदला गावातील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 12 क्युटी 3657 हे निष्काळजीपने चालवल्याने लाड यांच्या मोसाला पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या ज्ञानोबा बापुराव लाड, रा. पिंपळगाव (को.) यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

ढोकी पोलीस ठाणे : तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद येथील तानाजी आप्पा काळे, वय 42 वर्षे हे दि. 05.02.2022 रोजी 19.30 वा. सु. गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 3361 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 2375 हा निष्काळजीपने चालवल्याने तानाजी काळे यांच्या मोसाला समोरुन धडकला. या अपघातात तानाजी यांच्या डाव्या खांद्यास, छातीस व कानाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद ट्रॅक्टरचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या तानाजी काळे यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

येरमाळा पोलीस ठाणे : चालक- सतिष आश्रुबा पारडे, रा. इंदापूर, ता. वाशी यांनी दि. 09.02.2022 रोजी 10.30 वा. सु. वडगांव फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर क्रुझर वाहन क्र. एम.एच. 25 आर 6891 हे निष्काळजीपने चालवल्याने समोरील ऊस वाहून नेनाऱ्या ट्रॅक्टर- ट्रेलरला पाठीमागून धडकले. या अपघातात क्रुझर मधील शरद गपाट, शिवाजी जाधव, शिवाजी शिंगाडे यांसह स्वत: सतिष पारडे हे सर्व जखमी झाले. अशा मजकुराच्या शरद गपाट यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.

येरमाळा पोलीस ठाणे : मलकापुर, ता. कळंब येथील पांडुरंग काकडे, सोन्या काकडे, मोन्या काकडे या तीघांनी शेतातील पाणी वाटणीच्या कारणावरुन दि. 27.02.2022 रोजी 13.00 वा. सु. भाऊबंद- श्रीमंत प्रभु काकडे यांना त्यांच्या शेतात शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या श्रीमंत काकडे यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तुळजापूर पोलीस ठाणे : तुळजापूर येथील चंदाराणी कदम व पंकज छत्रे या दोघांनी दि. 27.02.2022 रोजी 18.00 वा. सु. हडको, तुळजापूर येथील सुभाष काशीनाथ छत्रे यांच्या घरात घुसून सुभाष छत्रे हे राहत असलेल्या घराच्या मालकीच्या कारणावरुन नमूद दोघांनी सुभाष यांसह त्यांच्या सुनेस शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुभाष छत्रे यांनी दि. 28.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top