google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई गुन्हा दाखल

0



Osmanabad news :- 

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय माहितीवरुन उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 28.02.2022 रोजी 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात अवैध मद्य जप्त करुन 4 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे खालील प्रमाणे 4 गुन्हे नोंदवले आहेत.

1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले असता जवळा, (नि.), ता. परंडा येथील नवनाथ चौधरी हे गावातील ईडा रस्त्यालगत एका शेडजवळ 180 मि.ली. क्षमतेच्या 19 बाटल्या देशी दारु व 25 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले तर ईडा, ता. भुम येथील अमोल भोसले हे गाव शिवारातील साखरकारखान्यासमोर 180 मि.ली. क्षमतेच्या 40 बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

2) इटकळ, ता. तुळजापूर येथील शंकर मडके हे गावातील एका हॉटेलजवळ 24 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द नळदर्गु पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

3) शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील लताबाई पवार या गावा शिवारात 35 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळल्या. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top