तहसिलदार तथा वात्सल्य समन्वयक समितीचे अध्यक्ष गणेश माळी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

0

Osmanabad news :- 
उस्मानाबादचे कर्तव्यदक्ष तहसिलदार तथा वात्सल्य समन्वयक समिती उस्मानाबादचे अध्यक्ष गणेश माळी  यांच्या वाढदिवसानिमित्त अंजुमन वेल्फेअर सोसायटी व तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समन्वयक समिती उस्मानाबादच्या वतीने शाल ,टोपी पुष्पगुच्छ व पेढे भरवुन 
सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समन्वयक समितीची आयोजित बैठक होती. या बैठकीत मागील वृत्तांत सांगितला व कोरोना काळातील दगावलेल्या व्यक्तीच्या वारसांना संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यावेळी तहसिलदार गणेश माळी, नायाब तहसिलदार राजाराम केरुळकर, क्षिरसागर, बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, सदस्य गणेश रानबा वाघमारे, अंजुमन वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष तथा मिशन वात्सल्य समन्वयक समिती सदस्य फेरोज पल्ला, किशोर वंगारवाडकर, सदस्य अंगणवाडी सेविका पंचायत समिती विभाग व समितीतील सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top