Osmanabad news :-
लोहारा शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.उर्मिला पाटील यांनी सर्व परीक्षार्थी, विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व केंद्र संचालक प्राध्यापक प्रशांत काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करून मास्क वापरण्याबद्दल विद्यार्थ्यांना आवाहन केले. या केंद्रावर एकूण कला विज्ञान व वाणिज्य शाखेचे 292 विद्यार्थी प्रविष्ट असल्याची माहिती दिली. यावेळी दत्ता जावळे पाटील, प्रा.उंबरे विजय, प्रा. कुलकर्णी लक्ष्मीकांत, प्रा.उद्धव सोमवंशी, अंकुश शिंदे, काकासाहेब आनंदगावकर, इत्यादी उपस्थित होते.