घुगी येथे तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात ४१० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार

0


Osmanabad news :- 

घुगी येथे तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात ४१० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार

उस्मानाबाद /प्रतिनिधी
डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व गणेश नागनाथ पवार यांच्या वाढदिवसा निमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन गुरुवार दि.३१ मार्च २०२२ रोजी, घुगी ता.उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात घुगी व परिसरातील सर्व वयोगटातील ४१० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन जि.प.चे माजी अध्यक्ष श्री गुंड गुरुजी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे घुगीचे उप सरपंच  रामेश्वर लोकरे, तंटामुक्चे प्रमुख बाळासाहेब जावळे, ग्रा.प.सदस्य बाबुराव गुंड (भाऊ), नागप्पा पवार, नवनाथ बनकर, अशोक इंगळे, अलाऊद्दीन शेख, पप्पु जावळे, मुजु शेख, राम जावळे, बळीराम सगर, गोविंद पवार सर, बळीराम पवार, ज्ञानदेव हसबे, दत्ता हसबे, आंगद जावळे, आबाराव जावळे, माणीक जावळे, अर्जुन जावळे, दिपीप जावळे, सुग्रीव जटाळे, राजेंद पवार, राकेश जटाळे, संतोष बनकर, कृष्णा जावळे, शुभम बनकर, बालाजी जावळे, वैभव जावळे, भैरु जावळे, शंकर सगर, जगन्नाथ चव्हाण, सचिन सगर, किसन सगर, बळीराम सगर, भरत जावळे, खंडू जावळे, ग्रामसेवक टी.आर.बिहीरे तसेच आशा कार्यकत्या क्वशीला वाघमारे, विजया सुरवसे व अंगणवाडी कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. निमेश पाटील, डॉ. रोहीत कोळी, डॉ.आदर्श यादव, डॉ. जय ओरा, डॉ. परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top