कृषी महाविद्यालयाचे जहागीरदारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

0

कृषी महाविद्यालयाचे जहागीरदारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न


Osmanabad news :- 

उस्मानाबाद; प्रतिनिधी-वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कार्यरत कृषी महाविद्यालय आळणी (गडपाटी) येथील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक 25 मार्च 2022 ते 31 मार्च 2022 दरम्यान मौजे जहागीरदारवाडी ता. जि. उस्मानाबाद येथे विशेष युवक-युवती साठी प्रबोधनपर श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

07 दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये ग्रामसमृद्धी विशेष कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान,माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड,वृक्ष संवर्धन विषयक प्रबोधन,ग्राम प्रदक्षिणा,महिला सक्षमीकरण सबलीकरण,व्यसनमुक्ती निर्मूलन इत्यादी उपक्रमांमध्ये मधून प्रबोधन करण्यात आले. यावेळी गावांमधील दर्शनीय ठिकाणे, मंदिर, ग्रामपंचायत व पाणवठ्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता करण्यात आली.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांना मार्फत माझी वसुंधरा अभियानांतर्गत 'एक विद्यार्थी एक झाड' संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले तसेच लिंग भेदभाव,जलसंवर्धन,व्यसनमुक्ती इ. सामाजिक प्रश्नांवर पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. कोरडवाहू शेती नियोजन व मातीपरिक्षण इत्यादी कृषि विषयक व्याख्यानाचे आयोजनही यावेळी करण्यात आले. 


कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना समिती स्थापन करण्यात आली होती ज्यामध्ये प्रा.एन.यस.सुतार, एस.व्ही.भालेकर, प्रा.डी. एस.शेटे, प्रा.पी.ए.गायकवाड, प्रा.के.ए.बुरगुटे, प्रा.एस.जगधने, प्राध्यापिका ए.जी.वाकळे, प्रा. एस.एन.साबळे, प्रा.आर.एस.पठाण, यांनी काम पाहिले तर अशोक सोन्ने, महाविद्यालय व्यवस्थापक हरी घाडगे, प्रा.के.एच.पाटील, यांनी विशेष सहकार्य केले तर शिबिराची रूपरेषा, नियोजन व कार्यक्रम समनव्यक  प्रा. के.डी. बंडे यांनी केले.यावेळी गावचे सरपंच शशिकांत राठोड, ग्रामसेवक एकनाथ माने, प्रसिद्ध व्याख्याते अशोक चव्हाण, सुरवसे, शाळेचे मुख्याध्यापक रणखांब यांनी सहकार्य केले. तर महाविद्यालयीन विद्यार्थी स्वराज मुंडे, राऊत पृथ्वीराज, शिवाजी झेंडे, विद्यार्थिनी ऋतुजा बाबर, वाघमारे रत्नाई, गायकवाड आकांक्षा,निरगुडे अमृता यांनी विद्यार्थी प्रतिनिधित्व केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top