Osmanabad news ;-
उस्मानाबाद -
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधि, मानवी हक्क व आरटीआय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड.विश्वजित विजयकुमार शिंदे यांना ’लोकशाहीचे योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे भव्य समारंभात भारतीय कॉग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव तथा विधी, मानवी हक्क व आरटीआय विभागाचे राष्ट्रीय प्रभारी अॅड. विपुल माहेश्वरी यांच्या हस्ते हा पुरस्कार अॅड.शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे टिळक भवन, दादर येथील महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी (दि.27) झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभास अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव आशिष दुवा, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. ठिपसे, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी मानवी हक्क व आयटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. रवी जाधव यांच्यासह विधिज्ञ व कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड.विश्वजित शिंदे हे काँग्रेस पक्षातील सक्रिय युवा पदाधिकारी असून पक्षाबरोबर सामाजिक कार्यातही ते सातत्याने पुढे असतात. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत समस्या व सामाजिक प्रश्नांवर देखील ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याने त्यांची काँग्रेस पक्षात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅड.विश्वजित शिंदे यांचे माजी मंत्री बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड.धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विधिज्ञ मंडळींमधून अभिनंदन होत आहे.