google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगली येथिल ओ बी सी ,व्ही जे एन्टी राज्यव्यापी मेळाव्यास उस्मानाबाद जिल्हयातुन मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार

सांगली येथिल ओ बी सी ,व्ही जे एन्टी राज्यव्यापी मेळाव्यास उस्मानाबाद जिल्हयातुन मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार

0

Osmanabad news :- 

सांगली येथिल ओ बी सी ,व्ही जे एन्टी राज्यव्यापी मेळाव्यास उस्मानाबाद जिल्हयातुन मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार

उस्मानाबाद-
उस्मानाबाद येथे आज बारा बलुतेदार महासंघाचे राज्य संपर्क कार्यालय उस्मानाबाद येथे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकित ओ बी सी व्हि जे एन्टी,राज्यव्यापी परीषद व मेळावा सांगली येथे आयोजित कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.याबैठकित कल्याण दळे साहेबांची ओ बी सी व्हि जे एन्टी परिषद महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी निवड तर धनंजय नाना शिंगाडे यांची राज्य समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष हंबीरे यांनी ओ बी सी मेळाव्या संदर्भात मार्गदर्शन करून जिल्हाभरातुन ओ बी सी व्हि जे एन्टी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे आश्वासन दिले.कळंबचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग कुंभार यांनी कळंब तालुक्यातुन सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.आज एकत्रित नाही आलोत तर पुढील पिढी आपणास माफ करणार नाही.ओ बी सी साठी आत्ताच सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे असे प्रतिपादन कुंभार यांनी केले.धनंजय नाना शिंगाडे यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली सर्व जातीचे जिल्हाप्रमुख बैठकिस उपस्थित रहतात परंतु एकटेच येतात.मतदानाच्या वेळी आपआपल्या परीने नेत्याची हुजरे गिरी करून मतदान त्यांच्या ओढीत टाकतात.अशीच परिस्थिती राहिली तर आपले ओ बी सी चे राजकिय आरक्षण थोक्यात आहे शैक्षिणीक आर्थिक आरक्षण धोक्यात आल्या शिवाय राहणार नाही व आपल्या मुलाचं भवितव्य धोक्यात येईल.हि वेळ आणु देऊ नका कळकळीची विनंती करतो.जाती जाती माणसं एका विचाराणं पुढं आली पाहिजे.ओ बी सी च्या नेतृत्वाला सगळ्या गोष्ठित मदत केली तर इतिहास घडेल.मी तर ओ बी सी व्हि जे एन्टी साठी प्रत्येकासाठी घर गड्यासारखा काम करण्यास तयार आहे.मी तुमचा आहे तुम्ही माझे आहात.प्रत्येकाचे संकट हेच माझे संकट समजुन मदत करीन जिवाचं राण करेन पण माझा बांधव उघडव्यावर सोडणार नाही.हे आश्वासन देतो असे धनंजय नाना शिंगाडे म्हणाले.यानंतर अध्यक्षीय भाषणात कल्याण दळे यांनी सांगलीतील राज्यव्यापी बहुजन परिषदेस प्रत्येक ओ बी सी व्हि जे एन्टी बांधवांनी प्रत्येकाच्या स्वखर्चाने या तरच आपली किंमत कळेल गाडी घोडी साठी कुणासमोरही हात पसरू नका.ओ बी सी बांधव असा लाचार होऊ नका.स्वत:च्या भविष्यासाठी एकत्रित या संघटीत व्हा तर आपण टिकु हिच वेळ आहे.आपली ताकद दाखऊन देण्याची आत्ता तरी संघटीत होऊ पुढची पिढी तुम्हाला कधिच विसरणार नाही.आत्तातरी सत्ताधारांच्या सतरंज्या उचलायचे बंद करा ओ बी सी, व्हि जे एन्टी नेत्यालाच आपल्या प्रत्येक समाज बांधवाने ताकद दिली पाहिजे तरच आपण टिकु नाहीतर पिड्यान पिड्या बरबात होतील.हिच काळाची गरज आहे. कार्यक्रमात सतिश कसबे,डि एन कोळी,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,बारा बलुतेदार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे,शिवानंद कथले.धनंजय राऊत,बप्पा मैंदाड यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास आबासाहेब खोत,सतिश कदम,संजोग पवार,नंदू कुराडे,दत्ता भालेकर,प्रेमचंद गोरे,बापु सुरवसे,मुन्ना मंडाळे,व्यंकट पवार,कृष्णा भोसले,दाजी आप्पा पवार,किशोर राऊत,मच्छिंद्र कांबळे,शंकर गोरे,प्रविण मंडलिक,सचिन पवार,आप्पा वाघमारे,रवि राऊत,फुलचंद गायकवाड,विधाते,अँड उस्मान मोरवे,सुत्रसंचालन व प्रास्ताविक नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले.

छाया राहुल कोरे आळणीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top