google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 चेकवर सही करून देण्यासाठी पंधराशे रुपये लाच स्वीकारताना कनिष्ठ सहाय्यक गजाआड उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

चेकवर सही करून देण्यासाठी पंधराशे रुपये लाच स्वीकारताना कनिष्ठ सहाय्यक गजाआड उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0
Osmanabad news :- 

चेकवर सही करून देण्यासाठी पंधराशे रुपये लाच स्वीकारताना कनिष्ठ सहाय्यक गजाआड उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

चेकवर सही करून घेऊन देण्यासाठी पंधराशे रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना भूम येथील कनिष्ठ सहाय्यक बांधकाम विभाग यांना उस्मानाबाद  लाच लुचपत विभागाने  आज ताब्यात घेतले आहे

आरोपी लोकसेवक  :- राजश्री उत्तमराव शिंदे, वय 40 वर्षे, पद :- कनिष्ठ सहाय्यक, जि. प.बांधकाम विभाग,उप विभाग भूम जि. उस्मानाबाद (वर्ग-3)

 उस्मानाबाद :- कनिष्ठ सहाय्यक, जि. प.बांधकाम विभाग,उप विभाग भूम यांनी लाच मागणी रक्कम :- 1500/- रुपये , लाच स्वीकृती दिनांक :- 14/03/2022 ,लाच स्वीकारली:- 1500/- रुपये कारण - यातील तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर  2021 मध्ये त्यांची सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक रक्कम बिलाच्या रु.91257/- च्या चेकवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांचेकडे 1500/- रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारली. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.  सापळा अधिकारी: - प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि . उस्मानाबाद व मार्गदर्शक - मा.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस  अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद  हि कारवाई पोअ/ दिनकर उगलमुगले,  मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके ला.प्र.वि, उस्मानाबाद यांनी केली आहे 

(कोणताही शासकिय अधिकारी/कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा.
 ️ फोन नं. 02472 222879
 ️ प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
95279 43100
 ️ अशोक हुलगे, पो.नि.ला.प्र.वि.उस्मानाबाद 86524 33397)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top