Osmanabad news :-
व्यवसायकर दात्यांनी 31 मार्चपूर्वी विवरणपत्र व कर भरुन विलंब शुल्क माफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
उस्मानाबाद.दि.14(जिमाका)महाराष्ट्र शासनाने नोंदीत व्यवसाय करदात्यांसाठी ‘विलंब शुल्क माफी योजना ' ( Late Fee waiver Scheme) आणली असून ज्या आस्थापनांनी डिसेंबर 2021 पर्यंतची व्यवसायकराची विवरणे प्रलंबित आहेत अशी सर्व विवरण पत्रे कोणतेही विलंब शुल्क न भरता केवळ कर आणि व्याज भरुन 31 मार्च 2022 पर्यंत भरता येतील.
तेंव्हा सर्व व्यवसायकर दात्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली डिसेंबर २०२१ पर्यंत प्रलंबित असलेली सर्व विवरणे विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन त्वरित भरावीत, विवरण पत्रे भरताना काही अडचणी आल्यास आपल्या जवळच्या व्यवसाय कर कार्यालयास भेट द्यावी अथवा pttechnicalissue@gmail.com या मेलवर समस्या कळवावी.व्यवसायकर नोंदणीधारक आस्थापनांनी त्यांच्या प्रलंबित कालावधीसाठीचा व्यवसायकर आणि त्यावरील व्याज भरुन आपली व्यवसाय कराची विवरणे 31 मार्च पर्यंत भरुन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी वस्तू व सेवाकर भवन, व्यवसायकर विभाग, उस्मानाबाद दूरध्वनी क्रमांक - ०२४७२ २२९८९५ येथे संपर्क साधावा असे आवाहन व्यवसायकर अधिकारी एस.एन सुरवसे यांनी केले आहे.