शासकीय कार्यालयात येताना दुचाकी सवारांना हेल्मेट आवश्यक विना हेल्मेट आढळल्यास कार्यवाही : गजानन नेरपगार
उस्मानाबाद,दि.30 ):- शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक,कर्मचारीआणिअधिकारी यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत करवाई करण्यात येईल. तेंव्हा दुचाकी वाहन चालवित असतांना नागरिक,कर्मचारी,अधिकारी यांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन उस्मानाबाद येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.
शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांश दुचाकी वाहनांच्या आपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत झालेले वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक आणि अंमलबजावणी संबंधी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.