Osmanabad news :-
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांनी शैक्षणिक खर्चासाठी अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.30(जिमाका):- उस्
अर्जासोबत बालकाचे शाळेचे बोनाफाईड , आई किंवा वडील कोवीड पॉझिटिव्ह असल्याबाबतच्या पुराव्याची झेरॉक्स प्रत , आई अथवा वडील मृत्यू झाल्याचा दाखला झेरॉक्स प्रत , बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याबाबत बँकेच्या पासबूकची झेरॉक्स प्रत, बालकाच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रतही अर्थसहाय्य मिळविण्याकरीता आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकीर्ण प्रकरण 377/2018 (श्वेता दणाणे वि केंद्र शासन व इतर) मध्ये 20 ऑक्टोंबर2021 रोजी देण्यात आलेल्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी बाल न्याय निधी महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे येथील आयुक्त यांनी अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या खात्यात हा निधी जमा केला आहे. या रकमेचा विनीयोग कोवीड 19 मध्ये एक वा दोन्ही पालक गमावलेल्या वयोगट 6 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रती बालक कमाल मर्यादा दहा हजार रुपये इतकी मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोवीडमुळे एककिंवा दोन पालक गमावलेल्या बालकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल अंकुश यांनी केले आहे.