पेट्रोल डिझेलवरील राज्याचा टॅक्स कमी करण्याच्या मागणीसाठी भाजयुमो धाराशिवच्या वतीने जोरदार निदर्शने

0

पेट्रोल डिझेलवरील राज्याचा टॅक्स कमी करण्याच्या मागणीसाठी भाजयुमो उस्मानाबादच्या वतीने जोरदार निदर्शने

भ्रष्टाचाराच्या प्रकरणापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी शिवसेना व आघाडी सरकारचे नौटंकी आंदोलन - राजसिंहा राजेनिंबाळकर

Osmanabad  दि. 4 -

पेट्रोल डिझेलवरील राज्यसरकारने लावलेला टॅक्स कमी करून इंधनाच्या वाढलेल्या किमतीत दिलासा द्यावा या मागणीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष काळे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदारपणे निदर्शने करण्यात आली. ठाकरे सरकार मधील दररोज चव्हाट्यावर येणार्‍या भ्रष्टाचाराच्या प्रकरणापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी शिवसेना व आघाडी सरकारचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टिका यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी पेट्रोल वरील टॅक्स कमी न करणार्‍या ठाकरे सरकारचा धिक्कार असोडिझेलवरील टॅक्स कमी न करणार्‍या ठाकरे सरकारचा धिक्कार असोरोज नवा भ्रष्टाचार करणार्‍या ठाकरे सरकारचा धिक्कार असोया ठाकरे सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणांनी परीसर दुमदुमून टाकत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या "आंदोलनाला कच्चे चिवसैनिक-कच्चे बदाम खा-अन बुद्धी वाढवा"

 आंदोलन असे नाव दिले होते. काही दिवसांपासून उस्मानाबाद शहरात शिवसेना,व आघाडी सरकारच्या वतीने इंधनदरवाढ संदर्भात आंदोलन करण्याचे नाटक केले जात होते.सामान्य जनतेच्या कोणत्याही प्रश्नांशी सोयरसुतक न ठेवता सत्तेचा वापर फक्त आणि फक्त स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी चालू असलेला दिसत आहेअसेही राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी म्हटले.

केंद्राच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारने डिझेलवरील 5 रुपये व पेट्रोलवरील 10 रुपये टॅक्स कमी केला होतामात्र राज्यातील ठाकरे सरकारने 1 रुपयांचाही टॅक्स कमी केलेला नाही. असे असतानाही सत्ताधारी शिवसेनेचे व आघाडी सरकारचे पेज-3 नेतेमंडळी चमकोगिरी आंदोलक केवळ स्वतःच्या पक्षाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आंदोलनाची नौटंकी करत आहेत असे मत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.

या आंदोलनात पांडुरंग लाटेअभय इंगळेपांडुरंग आण्णा पवारअर्चना अंबुरेइंद्रजित देवकतेपुजा देडेदाजी अप्पा पवारप्रविण पाठकअमोल पेठेसुजित साळुंकेवैभव हंचाटेमोहन मुंडेसंदिप इंगळेप्रवीण सिरसटसुनिल पंगुडवालेपृथ्वीराज दंडनाईकदाजी अप्पा पवारसचिन लोंढेराहुल शिंदेविद्या मानेदेवकन्या गाडेओम नाईकवाडीराज निकमअमित कदमहिम्मत भोसलेस्वप्नील नाईकवाडी,  मेसा जानरावड. कुलदिपसिंह भोसलेप्रीतम मुंडेओमकार देशमुखसुनिल पंगुंडवालेजगदिश जोशीप्रसाद मुंडेसागर दंडनाईकदादुस गुंडसार्थक पाटीलअजय उंबरेज्ञानेश्वर पडवळज्ञानेश्वर शिंदेनरेन वाघमारेज्ञानेश्वर सुळयुवराज घोडकेधनराज नवलेअक्षय भालेरावरोहित देशमुखअर्जुन पवारगणेश इंगळगीगीरीष पानसरेअजय यादवउदय देशमुखशंकर मोरेआकाश सलगरमोनु पाटील व सर्व युवा मोर्चामहिला मोर्चाएस.सी.मोर्चाओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top