Osmanabad news :-
समतेचे प्रतीक निळ्या ध्वजाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा चौकामध्ये ध्वजारोहण.
प्रतिनिधी दि. ०१ एप्रिल 2022 रोजी,ज्ञानसूर्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सायंकाळी ठीक साडेपाच वाजता उस्मानाबाद नगरीचे नगरसेवक सिद्धार्थ दादा बनसोडे यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते संजय दुधगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि समोरील संविधान प्रास्ताविक पुष्पहार अर्पण करून समतेचे प्रतीक असलेल्या निळ्या ध्वजाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समोर ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमास दि सोसायटी ऑफ इंडियाचे ता. तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,नगरसेवक राणा बनसोडे,दत्ता (भाऊ ) पेठे, लेखक विजय अशोक बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गायकवाड, मुकेश मोठे ,संजय गजधने, जानराव स्वराज, आप्पा धावारे,सागर माळाळे ,रमाकांत माळाळे,राहुल बनसोडे, अमित बनसोडे, किरण जेटिथोर,संकेत बनसोडे, अजित कदम, नितीन सोनवणे , राजदीप बनसोडे,नितीन झेंडे, प्रा. राजेश जगताप, दि बुद्धिष्ट ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणी धनंजय वाघमारे, , इत्यादी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.