कळंब शहरातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत मंजूर कामांचे भुमिपुजन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व मा. आ. श्री. कैलासदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न.
Osmanabad :-
कळंब नगरपरिषदेच्या हद्दीतील कळंब-ढोकी रोड ते ओम बालरुग्णालय ते बाबा नगर व दत्त नगर कळंब येथील रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना या रत्यांच्या दुरावस्थेचा त्रास सहन करावा लागता होता. या खराब रस्त्यांमुळे छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. या रस्त्यांच्या संदर्भात अनेक तक्रारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या मार्फत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलासदादा पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने लोकप्रतिनीधींनी मा. मुख्यमंत्री साहेब व मा. नगरविकास मंत्री साहेब यांच्याकडे सदर कामाबाबत पाठपुरावा करुन निधी उपलब्ध केला.
मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, नगरविकास मंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, व पर्यावरण मंत्री मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या विशेष सहकार्याने आज दि. 30/05/2022 रोजी कळंब शहरातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीमधून कळंब-ढोकी रोड ते ओम बालरुग्णालय ते बाबा नगर मधील सिमेंट रस्ता व काँक्रीट नालीचे बांधकाम (1 कोटी) व दत्त नगर येथील सिमेंट रस्ता व काँक्रीट नाली (1 कोटी) या कामांचे उद्घाटन मा. खा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व मा. आ. श्री. कैलासदादा पाटील यांच्या हस्ते व शिवसेना तालुकाप्रमुख श्री. शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या उपस्थितीत पार पडले. सदर कामांमुळे कळंब शहरातील वरील भागातील सांडपाण्याचा निचरा व रहदारीसाठी योग्य रस्ता होणार असून यामुळे नागरिकांच्या सुविधेत भर पडणार आहे.
याप्रसंगी शहरप्रमुख प्रदीप बप्पा मेटे, मुस्ताक भाई कुरेशी, हर्षद अंबुरे, दिलीप पाटील, सचिन काळे, भारत सांगळे, रतन माळकर, अश्रूबा बिकड, आनंद वाघमारे, सुलेमान मिर्झा, कवडे ताई, भारती गायकवाड, सागर बाराते, डॉ. रमेश जाधवर, शेख आली सर, फारूख शेख, सतिश टोणगे, दिलीप गंभीरे, शाम नाना खबाले, भागवत चोंदे, अनंत वाघमारे, रूकसाना बागवान, आतुल कवडे, संजय होळे, राजाभाऊ बोराडे, शैलेश शिंदे, विदया चौधरी, भैय्या खंडागळे, विजय पारवे, कळंब शहरातील पक्षाचे कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.