शासनाची फसवणूक करणाऱ्या सरपंचावर गुन्हा दाखल
भूम पोलीस ठाणे : कोविड- 19 साथीमुळे सन- 2020 मध्ये ग्रामपंचायतीच्या सभा झाल्या नसून सरपंच, ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ते संबंधी ठराव, भाडेकरार करण्याचा अधिकार नाही. तरीही चिंचोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच- महादेव वारे यांसह भास्कर वारे, सोमनाथ चौधरी, रतनबाई वारे, तात्यासाहेब वारे, वसुदेव साबळे, युवराज साळुंके, आश्रुबा चव्हाण, मैनाबाई साळुंके यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यवाही नोंदवहीत सभा झाल्याच्या, ठरावाच्या खोट्या नोंदी व ग्रामसेवक रायकर यांच्या खोट्या सह्या केल्या. या खोट्या ठरावाच्या आधारे त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेचा भाडेकरार रनजीत शिर्के यांच्यासोबत केला.
अशा मजकुराच्या ग्रामसेवक- दिलीप रायकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 468, 469, 470, 471, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.