बोरगाव धनेश्वरीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -डॉ.प्रतापसिंह पाटील

0
बोरगाव धनेश्वरीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -डॉ.प्रतापसिंह पाटील 

 नूतन सरपंच सत्कारप्रसंगी प्रतिपादन

कळंब- कळंब तालुक्यातील बोरगाव धनेश्वरीच्या सरपंच पदी महाविकास आघाडीच्या लिंबाबाई हनुमंत सांगळे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी बोरगावचे सुपुत्र डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

 यावेळी नूतन सरपंच लिंबाबाई हनूमंत सांगळे याच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य बापू चोरघडे,माजी सरपंच फतिमा पठाण,नंदा दिनेश पाटील,मिरा तुपारे, संपत्ती कुचेकर यांचा ही सन्मान करण्यात आला तर गावाला मोफत पाणपोईची सोय करणारे लक्ष्मण चोरघडे यांचा विशेष सत्कार केला.

शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भारत सांगळे, नितीन पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामराजे पाटील,सुशीलकुमार पाटील,महादेव पाटील,दत्ता चोरघडे,धर्मराज चोरघडे,सर्जेराव चोरघडे,आण्णा सांगळे,बालाजी सांगळे, हनुमंतराव सांगळे,दत्ता सांगळे,गजानन पाटील, दिनेश पाटील,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आनंद जोशी,तलम पठाण,अक्षय पाटील,लक्ष्मण चोरघडे,अबन शेख,दत्ता पाटील,अमोल चोरघडे हे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, गावचा विकास करायचा असेल तर राजकारण हे फक्त निवडणूकीपूरते करा,पाचही वर्ष राजकारण डोक्यात ठेवून काम केले तर ते गाव विकासापासून लांब राहते म्हणून निवडणूक झाली की कोण कोणत्या पक्षाचा हा विचार न करता  तो माझ्या गावचा हा विचार करावा अशी सूचना ही यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना केली.गावात नवीन योजना विकासकामे आणण्यायासाठी मी सदैव जिल्हा व राज्यपातळीवरील गावात मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारत सांगळे यांनी केले तर आभार नितीन पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top