लोहारा तालुक्यातील तलाठी 25 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
Osmanabad news :
उस्मानाबाद :- दि 23/05/2022 रोजी उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून यामध्ये तक्रारदार- पुरुष, वय 24 वर्षे यांनी दिलेल्या माहितीनुसार पडताळणी करून सापळा रचला व लाच स्वीकारताना लोहारा तालुक्यातील येथील तलाठी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले असून
आरोपी लोकसेवक :-1.युवराज नामदेव पवार, वय 36 वर्षे,
पद :- तलाठी,वर्ग -3,सजा-अचलेर, ता.लोहारा जि. उस्मानाबाद.
2.प्रभाकर रुपनर,वय-37वर्षे, पद-कोतवाल,वर्ग 4सजा-अचलेर, ता.लोहारा जि. उस्मानाबाद.
➡️ लाचमागणी दिनांक :- 23/05/2022
▶️ लाच स्वीकृती दिनांक :- 23/05/2022
➡️ लाच मागणी रक्कम :-30000/- रुपये
▶️ लाच स्वीकारली:- 25000/- रुपये
▶️ कारण - यातीलतक्रारदार यांचे वडिलांनी सन 2005 मध्ये घेतलेल्या शेतीचा फेर फार वरिष्ठकडून मंजूर करून देण्यासाठी यापूर्वी 10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याचे मान्य करून तसेच आज रोजी सदर कामासाठीच वरिष्ठकडून फेर फार मंजूर करून देण्यासाठी आणि ऑनलाईन नमुना नंबर 9 ची नोटीस काढण्यासाठी लोकसेवक पवार तलाठी व कोतवाल रुपनूर यांनी तक्रारदार यांना 30,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडी अंती 25,000/- रुपये लाच रक्कम आलोसे पवार यांनी पंचासमक्ष स्वीकारली
हि कारवाई सापळा अधिकारी: - अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि . उस्मानाबाद, मार्गदर्शक - मा.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद , मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद.
सापळा पथक - पोअ/ इफ्तेकर शेख,शिधेश्र्वर तावसकर ,विष्णु बेळे ,अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे ला.प्र.वि, उस्मानाबाद. यांनी केली आहे,
आपल्याकडे कोणी लाचेची मागणी करत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे