उस्मानाबाद पोलीस दलात उद्या दि.24 मे रोजी तक्रार निवारण दिन.”
Osmanabad news :-
उस्मानाबाद पोलीसांना प्राप्त होणा-या विविध स्वरुपाच्या तक्रार अर्जांचा निपटारा संबंधीत पेालीस ठाण्यांमार्फत् केला जात असतो. मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या संकल्पनेतुन उदया मंगळवार दिनांक 24 मे रोजी सर्व पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असुन या दिवशी तक्रार अर्जाशी संबंधीत व्यक्तींनी संबंधीत पोलीस ठाण्यात जाउन आपल्या समस्येचे निराकरण करुन घ्यावे. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षकानी केले आहे.