चोरीच्या 9 विद्युत मोटारींसह आरोपी 24 तासांत अटकेत
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : उस्मानाबाद- औसा रस्त्यालगतची सुत गिरणी बंद असल्याची संधी साधून गेल्या काही महिन्यांत गिरणीतील 20 शिवण यंत्रे, शिवण यंत्रांच्या 50 विद्युत मोटारी, 250 पंखे, एक रेफ्रीजरेटर, तीन तारांच्या विद्युत वायरचे 25 वेटोळे, एक बॉयलर विद्युत मोटार, एक बोअरवेल विद्युत मोटार असे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. या प्रकरणी गिरणी सुरक्षा व्यवस्थापक- पांडुरंग मुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आज दि. 22 मे रोजी रात्री 01.00 वा. गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोना- हुसेन सय्यद, रवि आरसेवाड, साईनाथ आशमोड यांच्या पथकाने वेगाने चक्रे फिरवून सांजा येथील सुनिल राजेंद्र पवार यास नमूद चोरीतील साहित्यापैकी शिवण यंत्रांच्या 9 विद्युत मोटारींसह ताब्यात घेतले असून उर्वरीत साहित्याविषयी व अन्य सहकाऱ्यांविषयी पोलीस तपास करत आहेत.