चोरीच्या ट्रॅक्टर- ट्रेलरसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0



चोरीच्या ट्रॅक्टर- ट्रेलरसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Osmanabad : स्थानिक गुन्हे शाखा : तेरखेडा, ता. वाशी येथील भुषण भिमाशंकर उमरदंड यांचा ट्रॅक्टर- ट्रेलर क्र. एम.एच. 25 एडी 1135 हा दि. 25- 26 मे रोजी दरम्यान त्यांच्या गट क्र. 1304 मधील शेतातील गोठ्यासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. या प्रकरणी भुषण उमरदंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 28 मे रोजी रात्री 21.42 वा. येरमाळा पो.ठा. येथे गु. क्र. 126 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, श्री. शैलेश पवार, पोहेकॉ- वलीऊल्ला काझी, विनोद जानराव, धनंजय कवडे, पोना- शौकत पठाण, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने वेगाने चक्रे फिरवली. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तेरखेडा येथील प्रकाश पांडुरंग मांडवकर यांसह त्यांनी गडदेवधरी येथील डोगरात लपवून ठेवलेले नमूद चोरीचे ट्रॅक्टर- ट्रेलर ताब्यात घेतले. पुढील कारवाईस्तव त्यास नमूद वाहनासह येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून गुन्ह्याचा उर्वरीत तपास चालू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top