स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा विरोधी कारवाई
Osmanabad news :-
स्थानिक गुन्हे शाखा : कळंब तालुक्याती शिराढोन ग्रामस्थ- जमीर जिलाणी तांबोळी, वय 32 वर्षे हे दि. 26 मे रोजी 17.00 वा. सु. राहत्या घरासमोर ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 25 एजे 3125 मध्ये मानवी आरोग्यास धोकादायक असलेला व महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण 5,26,870 ₹ चा माल बाळगलेले असताना स्था.गु.शा. चे पोनि- श्री. खानाळ, सपोनि- निलंगेकर, पोहेकॉ- जानराव, काझी, निंबाळकर, काझी, चौरे, पोना- पठाण, काकडे, कवडे, जाधवर, टेळे, सोनवणे, पोकॉ- पठाण यांच्या पथकास आढळले. यावरुन पथकाने तांबोळी यांना नमूद वाहन व त्यातील अन्न पदार्थासह ताब्यात घेउन पोहेकॉ- विनोद जानराव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोन पो.ठा. येथे गुन्हा क्र. 119/ 2022 हा भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 अंतर्गत नोंदवला आहे.