उमरगा तालुक्यातील आलूर येथे क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी...

0

उमरगा तालुक्यातील आलूर येथे क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी...

{ उमरगा : चेतन पवार }

उमरगा तालुक्यातील आलूर येथे क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दिनांक ३ मे रोजी बसवेश्वर चौकात ध्वजारोहण, ग्रामपंचायत आलुर येथे प्रतिमेचे पूजन आणि सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसवेश्वर मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्यात आले. ४ मे रोजी रात्री ८ वाजता कर्नाटकातील प्रसिद्ध पारिजात भजनाचा कार्यक्रम पार पडले. ५ मे रोजी सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ६ मे रोजी विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आले. तर ७ मे रोजी महाप्रसादाचे वाटप करून बसवेश्वर मूर्तीचे भव्य मिरवणूक ५१ बैल जोडीसह, बँड पथक, डीजे सह काढण्यात आले. जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भैरव पाटील, उपाध्यक्ष वैभव स्वामी, सचिव पंडित देशट्टे कार्याध्यक्ष गणेश बब्बे, महेश जेऊरे, राजेंद्र मंटगे, चंदू भाकरे, सोमा कुंचगे, जगदीश पाटील, रोहन बिराजदार, अभिषेक मलंग, निळकंठ स्वामी, सिद्धाराम जेऊरे, पवन काबडे, पिल्लू वाकडे सह शिवा संघटनेचे कार्यकर्ते आणि बसव भक्त मोठ्या संख्येने प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top