इंधनावरील कर कमी केल्याची फसवी घोषणा करणार्‍या आघाडी सरकारचा खोटारडेपणा उस्मानाबाद भाजयुमोर्चाने केला उघड तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

0



इंधनावरील कर कमी केल्याची फसवी घोषणा करणार्‍या आघाडी सरकारचा खोटारडेपणा उस्मानाबाद भाजयुमोर्चाने केला उघड तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

 

उस्मानाबाद – महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने इंधनावरील कर कमी केल्याची नुकतीच घोषणा केली असून प्रत्यक्षात इंधनाचे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणार्‍या घोषणाबहाद्दर राज्य सरकारने येत्या तीन दिवसात इंधनाचे दर कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उस्मानाबाद भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज (दि.25) निवेदन देण्या बरोबरच प्रत्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चाची टीम कांही पेट्रोल पंपावर जाऊन ठाकरे सरकारने घोषीत केलेले पेट्रोल व डिझेल वरील रु. २.८ व रु. १.४४ इंधन कर कमी केल्याची घोषणा फसवी निघाली हे सामान्य जनतेच्या निदर्शनास आणून दिले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडेले असताना सुद्धा जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधून पेट्रोलवर 9.09 रुपये आणि डिझेलवर 7.30 रुपये कर कमी केलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जवळपास 2 लाख कोटीपेक्षा जास्त भार बसणार आहे. केवळ जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. आजघडीला केंद्र सरकारचा इंधनावरील कर 19 रुपये आहेतर राज्य सरकार 30 रुपये कर आकारत आहे. महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये पेट्रोल व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असून जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तात्काळ इंधनावरील कर कमी करण्यात यावा. संपूर्ण देशातील इतर राज्ये सतरा-अठरा रुपये कर आकारत असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात आकारलेला कर हा जनतेवर घोर अन्याय करणारा आहे. 

त्यामुळे राज्य सरकारने इंधनावरील दर आपल्या लायकी प्रमाणे प्रत्येकी रु. ३.०० म्हणजेच एकुण रु. ९.०० तरी कर तात्काळ कमी करावाजेणेकरुन महागाईतून जनतेला दिलासा मिळेल. येत्या तीन दिवसांत महाविकास आघाडीने इंधनावरील कर कमी न केल्यास भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक आंदोलन करील. आंदोलन काळात अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार राहीलअसा इशाराही भाजयुमोच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजप शहराध्यक्ष राहुल काकडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडीयुवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित साळुंकेसरचिटणीस अ‍ॅड.कुलदीपसिंह भोसले, विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, सलमान शेख, हिम्मत भोसले, अमोल पेठेधनराज नवलेज्ञानेश्वर पडवळसागर दंडनाईकओंकार देवकते, हर्षद ठवरे, नवनाथ सोलनकर, कृष्णा आवारे यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर 9.09 रुपये तर डिझेलवरील कर 7.30 रुपयांनी कमी केला आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पेट्रोलवरील कर 2.8 रुपये व डिझेलवरील कर 1.44 रुपये कमी केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आम्ही  आज धाराशिव शहरातील एका पेट्रोल पंपावर जाऊन  राज्य सरकारच्या घोषणेप्रमाणे इंधनाचे दर खरेच तेवढ्या प्रमाणात कमी झाले आहेत का याची खात्री केली. तेव्हा इंधनाचे दर कमी झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या घोषणेत कोणतेही तथ्य नसून जनतेची निव्वळ दिशाभूल केली आहे. शेतकरीसर्वसामान्य जनतेची महाविकास आघाडी सरकारला कसलीही काळजी नसून केवळ फसव्या घोषणा करुन जनतेची दिशाभूल करत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलणे एवढेच काम महाविकास आघाडी करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top