उस्मानाबाद शहरातील भीमनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीला मोठा प्रतिसाद
उस्मानाबाद -
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद शहरातील भीमनगर येथे आज 25 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात भीम नगरसह परिसरातील युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली असल्याची महिती राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी दिली.

भीम नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग असून प्रत्येक निवडणुकांमध्ये येथून पक्षाच्या उमेदवाराला नेहमीच मताधिक्य दिलेले आहे. पक्षाच्या समर्थकांची सभासद नोंदणी करुन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याला कार्यकर्त्यांसह नवयुवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी विशाल शिंगाडे यांनी सांगितले. या अभियानामुळे उस्मानाबाद शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघट अधिक मजबूत होणार असून पक्षाची ताकद वाढणार असल्याचेही श्री.शिंगाडे म्हणाले.
नोंदणी अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्यासह अजय कांबळे, सत्यजित माने, अविनाश शिंगाडे आदी युवकांनी सभासद नोंदणीचे अर्ज भरुन घेतले.