उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार

0

Osmanabad :- 

वाशी तालुक्यातील फक्राबाद सरपंच तथा जिल्हा राष्ट्रवादी (कॉ)युवकचे कार्याध्यक्ष नितीन बिक्कड यांच्या गाडीवर शुक्रवार दि.17/6/2022रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास पारा फक्राबाद रोडवर त्यांचा गाडीवर गोळीबार झाला. सुदेवाने नितीन बिक्कड सुखरूप आहेत. त्यांना कुठलीही इजा झाली नाही. रात्री बिक्कड हे साडेनऊच्या सुमारास त्यांच्या महिंद्रा गाडीतून (एम एच 25 ए डब्लू 6868)एकटेच पाऱ्याकडे येत होते. गावालगतच्या मांजरा नदीवरील पुलाजवळ वेताळ मावल्या जवळ तोंडाला मास्क लावलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीला हात केला. नितीन बिक्कड गाडी रस्त्याच्या कडेला घेत. असताना अचानक समोरून त्यांनी गोळीबार सुरु केला. बिक्कड यांनी तशीच गाडी पळवत पारा गाटले. व पारा प्राथमिक आरोग्य केंद्रात ते दाखल झाले.त्यांना कुठलीही इजा झाली मात्र बीपी वाढल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top