प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उदयोगांच्या विस्तारासाठी दहा लाख रुपयांचे अनुदान
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.07 ):- असंघटीत अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोगांना वित्त पुरवठा करुन संघटीत क्षेत्रामध्ये आणण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन (उस्मानाबाद जिल्हयाकरीता कडधान्य पिके ODOP ( हरभरा,तुर,मुग व उडीद इ. ) तसेच इतर पिकाखालील नविन प्रक्रिया उदयोग (NON-ODOP ) सुरु करण्यासाठी लाभ घेता येईल. 18 वर्षावरील सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच शिक्षणाची अट नाही.योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उदयोग,शेतकरी उत्पादक कंपन्या,सहकारी संस्था,शेतकरी, निर्यातदार, स्वयंसहाय्यता बचत गट, शासकीय संस्था अर्ज करु शकतात.
या योजनेंतर्गत वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्पास किमतीच्या 35 टक्कयापर्यंत आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपये या मर्यादेपर्यंत प्रती प्रकलपासाठी अनुदान देय असणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करणे,तांत्रिक मार्गदर्शनासाठी जिल्हा संसाधन व्यक्तींची मदत मिळणार आहे. योजनेंतर्गत सामान्य पायाभुत सुविधांतर्गत दहा कोटीपर्यंतच्या प्रकल्पांना प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अर्थसहाय्य मिळणार आहे.
पॅकेजिंग,विपणन,ब्रँडिंगसाठी 50 टक्के अनुदान,कौशल्य प्रशिक्षण पत संलग्नित भांडवल अनुदान प्रती बचत गटास चार लाख बीज भांडवल,सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक करण्याऱ्या उद्योजक ,महिला उद्योजक तयार होऊन रोजगार निर्मितीस संधी,आस्तित्वात असलेल्या सुक्ष्म उदयोगांचे आधुनिकिकरण,प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी संसाधन व्यक्तींची मदत होणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी अर्ज स्वत: अथवा संसाधन व्यक्ती यांच्या मदतीने https://pmfme.mofpi.gov.in/ संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.