राज्यसभा निवडणूकित भाजपच्या विजयाबद्दल उस्मानाबाद शहरात जल्लोष !!!
उस्मानाबाद :- राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल आ.राणाजगजीतसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद शहरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून, फटाक्यांची अतिषबाजी करत, घोषणा देत यशाचा जल्लोष करण्यात आला.
मा.श्री. पियूषजी गोयल, मा.श्री.अनिलजी बोंडे आणि मा.श्री. धनंजयजी महाडिक यांचा विजय भाजपावरील विश्वासार्हतेला सार्थ ठरविणारा आहे. विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने दिल्या.
हा विजय पंतप्रधान मा. ना. नरेंद्र मोदी जींच्या नेतृत्वाचा, जगत प्रकाश नड्डा जी व अमित शहा जी यांच्या मार्गदर्शनाचा आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस जी, चंद्रकांतदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांचा आहे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मल्हार पाटील, ॲड. खंडेराव चौरे, सुधीर पाटील, नितीन भोसले, राजसिंहा राजेनिंबाळकर, राजकुमार पाटील, राहुल काकडे, धनंजय रणदिवे, प्रविण सिरसाठे, पांडुरंग लाटे, अभय इंगळे, विनायक कुलकर्णी, देवा नाईकल, दाजीप्पा पवार, शेषेराव उंबरे, ओम नाईकवाडी, अमित कदम, लक्ष्मण शिंदे, राज निकम, प्रितम मुंडे, सुनील पंगुडवले, सचिन लोंढे, संदीप कोकाटे, वैभव हांचाटे, सुजित साळुंके, सागर दंडनाईक भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.