उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी विरुध्द गुन्हे दाखल
Osmanabad news :-
बेंबळी पोलीस ठाणे : कनगरा, ता. उस्मानाबाद येथील सोमनाथ रघुनाथ ढेपाळे हे आपल्या घराचा दरवाजा पुढे करुन दि. 10 जून रोजी 02.30 वा. सु. कुटूंबीयांसह अंगणात झोपले होते. यावेळी गावातील- सयाजी इंगळे यांनी ढेपाळे यांच्या अंगणातील बल्ब विझवून घरात प्रवेश करुन पिशवीतील 50,700₹ रक्कम चोरुन नेत असताना इंगळे यांच्या पायाचा धक्का ढेपाळे यांस लागला. यावर ढेपाळे यांनी इंगळे यांस पकडले असता त्यांनी ढेपाळे यांच्या हातास झटका देउन तेथून पळ काढला. अशा मजकुराच्या सोमनाथ ढेपाळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : गवळी वाडा, उस्मानाबाद येथील दिनकर मधुकर निकम यांच्या बार्शी रस्त्यालगत असलेल्या ‘निकम किराणा’ दुकानाच्या शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 09- 10 जून रोजी दरम्यानच्या रात्री तोडून दुकानातील तेल, साबण, पावडर, पेस्ट, शाम्पू असे इत्यादी किराणा साहित्यासह गल्ल्यातील 7,500 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिनकर निकम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : लिंबोनी, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर येथील अर्जुन शिवाजी शिंदे यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीयू 5132 ही दि. 09- 10 जून रोजी दरम्यानच्या रात्री वाशी येथील बाबा पेट्रोल पंप जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अर्जुन शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.