लैंगीक शोषण प्रकरणी एकास सश्रम कारावास

0


तुळजापूर पोलीस ठाणे : महिलेचे लैंगीक शोषण करणाऱ्या आरोपी- विलास कोंडीबा गलांडे, रा. पुळकोटी, ता. माण, जि. सातारा यांच्याविरुध्दच्या तुळजापूर पोलीस ठाणे गुन्हा क्र. 180 /2018 चा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. घुगे यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात दोषारोप सादर केले होते.

या सत्र खटला क्र. 92 / 2018 चा निकाल आज दि. 04 जून रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. जगताप यांच्या न्यायालयात जाहिर झाला. त्यानूसार लैंगीक शोषण करुन भा.दं.सं. कलम- 376 (3) चे उल्लंघन केल्याबद्दल गलांडे यांस 20 वर्षे सश्रम कारावासासह 7,000 ₹ दंड तसेच मारहानीत साधी दुखापत करुन भा.दं.सं. कलम- 323 चे उल्लंघनाबद्दल 2 वर्षे सश्रम कारावासासह 1,000 ₹ दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top