सकारात्मकता आणि सुसंवाद हे रुग्णांवर औषधाइतकेच प्रभावी - अर्शद सय्यद
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात भावी डॉक्टरांसाठी व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा संपन्न
उस्मानाबाद, दि. 23 -
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणार्या व्यक्ती रुग्णसेवेचे मोठे कार्य करतात. ईश्वरानंतर माणूस ज्याच्यावर विश्वास ठेवतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. या क्षेत्रात काम करताना सकारात्मकता आणि सुसंवाद हे रुग्णांवर औषधाइतकेच प्रभावी ठरतात, असे मत प्रसिद्ध वक्ते अर्शद सय्यद यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अर्शद सय्यद बोलत होते. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्शद सय्यद म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा करताना सकारात्मक आणि प्रभावी दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रातील सर्व गोष्टींचा सूक्ष्मपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना व्यक्तीमत्व विकासाला तेवढेच महत्त्व द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी आपण कोणकोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे, याविषयी त्यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट करुन सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे देखील त्यांनी समाधान केले.
कार्यशाळेला इरफान तांबोळी, जफर पठाण तसेच आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.