अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान तेर येथे मोठा दारु साठा जप्त

0



अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान तेर येथे मोठा दारु साठा जप्त


Osmanabadnews :


ढोकी पोलीस ठाणे : मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याने कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागात कारवाया केल्या जात आहेत. मोहिमेदरम्यान ढोकी पोलीसांना माहिती मिळाली की, तेर येथील रविंद्र जालींदर राउत यांच्या घरात अवैध मद्याचा साठा आहे. यावर ढोकी पो.ठा. चे सपोनि- श्री. जगदीश राउत यांसह पोलीस अंमलदार- क्षिरसागर, तरटे, साखरे, मोरे, तुरेवाले यांच्या पथकाने आज दि. 7 जुलै रोजी सकाळी रविंद्र राउत यांच्या घरी छापा टाकला. यावेळी फक्त महाराष्ट्र व फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याच्या 180 मि.ली. च्या एकुण 1,278 बाटल्या, 90 मि.ली. च्या विदेशी मद्याच्या 20 बाटल्या, 2 लिटरच्या 7 बाटल्या तर देशी दारु 180 मि.ली. च्या 130 बाटल्या असा एकुण 2,46,080 ₹ किंमतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मद्य मनाई अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  


(तेर येथील अवैध मद्य विरोधी छाप्याचे छायाचित्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top